मुख्य सामग्रीवर वगळा

"मोग्याम्बो खुश हुआ"....!

After & Before look with expressions🥰 लहान मुलांचे प्रत्येक हावभाव टिपण आणि ते शब्दात व्यक्त करणं हे फार कठीण असत, लहान बाळाला ऐकूण एक गोष्ट समजत असते आणि प्रत्येक गोष्टीला ते वेगवेगळ्या पद्धतीने आनंदी होतात त्यांचा तो आनंद पाहूनच मोठी माणसं हर्षउल्हाहसित होत असतात. घरात लहान बाळ असणे म्हणजे आभाळा एवढं मोठं सुख 🥰🥳 पिल्लूचे केस कापायचे, त्याच टकलू करायचं किती दिवसापासून घरातील सगळे अक्षरशः नाचत होते. शेवटी आज टकलू केलच.👶 आमचा आनंद पाहून ते पिल्लू पण एवढं उड्या मारू लागलं कि त्याच्या हे निरागसपणे खुश होण म्हणजे ह्या घराचं खूप मोठं सौख्य.🏡 पिल्लू टकलू करायला भारी मजेत बसल पण थोडं दाबून चेपून धरलं तर भोकाड पसरून रडायला लागलं.😭😫 केस कापून होतंय कुठं तर बाबांनी उचल तस दुकानात नेलं आणि भरपूर खाऊ घेऊन दिला.🍫🍭🍪🍿 मग काय रडू कोणत्या गावाला पळाल कुणास ठाऊक🥰. नाटकी रडणं ते म्हणा....😉😆🤣 आणि काय बाईक वरून मोठा चक्कर घरी आला तर त्याचे सगळं मित्र मैत्रिणी आनंदात उड्या मारून टकलू नान्टू चिडवू लागले.☺️ सगळ्यांचा जल्लोष पाहून आमचा शाकालपण खुश..😁 मम्माने शाकाल नाव ठेवलं तर मासी ने फोटो पोजेस पाहून "मोग्याम्बो खुश हूआ" नाव ठेवलं..... आई चांदोबा म्हणतेय. नारळ गोट्या, उजडा चमन असे कितीतरी नवीन नाव माझ्या प्रत्युष ला आज मिळाले🥳. एवढे सुंदर कुरळे केस कापल्याचे थोडस वाईट पिल्लुपासून आम्हा सर्वांनाच वाटलं पण, त्याहून जास्त आनंदच झाला💃🏻👶🕺🏻. माझा शाकाल अधून मधून आठवण आली कि त्याच्या टकलू वरून हात फिरवून त्याचे केस शोधतो...😝😝😆🤣❤️😘 ल्ब्यू श्वीट श्वीट पिल्लू👶😘😘

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...