#माझ्या "#प्रबुद्ध" #चे_भाषांवरील_प्रभुत्व.
वयाचे पहिली पाच वर्षे भाषा शिकण्याच कौशल्य लहान मुलांमध्ये असत, हे मी जाणून होते. ह्या वयात त्यांना कुठलीही भाषा शिकवली तर ती त्यांना ती येतेच येते त्याचप्रमाणे आयुष्यभर लक्षात राहतेच. पण अगदी चार ते पाच महिन्यात एखादी भाषा पूर्णपणे समजून लहान मुल्लांना बोलता येऊ शकते. हे माझ्यासाठी खूप मोठे आश्चर्य आहे. माझं गुणी बाळ खूप लवलर बोलायला शिकले, सुरवात मातृभाषा मराठी भाषा त्याला खूप छान पद्धतीने समजली आणि बोलायलाही शिकला. मराठी सोबतच आजूबाजूला त्याच्या हिंदी बोलणाऱ्या मैत्रिणी असल्यामुळे त्याला बरचस हिंदी सुद्धा समजत आणि बोलतो देखील. मराठी हिंदी सोबतच मी घरात त्याच्यासोबत इंग्लिश मध्ये पण बोलत असल्यामुळे इंग्लिश भाषेवरही त्याच प्रभुत्व मिळवण्याचं लक्ष मी देत आहे.
पुढे तो जेव्हापासून जपान ला आला तेव्हापासून जापनीज शाळेत जाऊ लागला. शाळा सुरु होऊन केवळ चार महिने जरी झाले असले तरीही. त्याच्या शिक्षकांचं म्हणणे आहे तो खूप छान पद्धतीने जपानीज भाषा बोलतो आणि आम्ही बोललेले त्याला सर्व समजते देखील.
ऐकून चार भाषा त्याला समजतात आणि काहीप्रमाणात बोलताही येतात. दोन वर्षाच्या वयात त्याची हि प्रगती पाहून मी धन्य आहे.
आज त्याच्या शाळेतून त्याला त्याच्या येत्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छया पत्र भेट दिल. जपान मध्ये ९ ऑगस्ट ह्या दिवशी Mountain Day निमित्त सार्वजनिक सुट्टी असते. ह्या सुट्टीबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे,
A new holiday since 2016, celebrating the nation's mountains. Mountain Day is intended is to provide “opportunities to get familiar with mountains and appreciate blessings from mountains".
म्हणून माझ्या प्रत्युष बाळा तुला जगातील सगळ्या Mountain’s🏔 एवढ्या शुभेच्छया. माझं स्वप्न आहे जास्तीत जास्त भाषांचे ज्ञान तुला अवगत होओ. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा ज्ञानी युगपुरुष व्हावास. बुद्धांसारखी बुद्धी माझ्या "प्रबुद्ध" ला अवगत व्हावी. तुला खूप खूप अनेक अनेक आशीर्वाद माझ्या राजपुत्रा.
पुढील संपूर्ण नऊ दिवस जपान मध्ये सार्वजनिक सुट्ट्या असतात त्या म्हणजे "ओबान हॉलिडेज" ओबान फेस्टिव्हल थोडक्यात सांगायचं म्हणजे,
The origins of Obon
The Buddhist festival has been celebrated for more than 500 years. It originates from the story of Maha Maudgalyayana (Mokuren). He was a disciple of Buddha who used his powers to see the spirit of his deceased mother. He discovered she had fallen into the Realm of Hungry Ghosts and was suffering.
Buddha advised Mokuren to make offerings to Buddhist monks. On the 15th day of the 7th month, he followed Buddha’s advice and his mother was released from her suffering. Mokuren danced with joy which is the origin of the Obon dance.
अर्थात हा संपूर्ण आठवडा हा बुध्दिस्ट सण आहे. आणि ह्या सणाच्या पहिल्या दिवशी माझ्या प्रत्युषचा वाढदिवस आहे. खूप खूप सुंदर आणि आनंदी भावना माझ्यात उत्पन्न होत आहे. हे सगळं मला माझ्या बाळाच्या बुद्धिवंत होण्याला आशीर्वाद देत असल्याचं भासत आहे.
राजश्री जगताप.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा