मुख्य सामग्रीवर वगळा

जपान आणि वडापाव....
              आज कामावर जायची अजिबात इच्छा नव्हती फ्रेश होऊन पुन्हा सोफ्यावर येऊन झोपले. काय ग काय झालं उठ आवर पिल्लूला पण उठव, ह्म्म्म..! काय होतय? अंमहूमं... नसेल इच्छा तर आज अराम कर नको जाऊस. उद्याची सुट्टी घेतली आहे मी आज जाते. ओके उठ मग... 

       कस तरी जीवावर येऊन आवरलं खर, आग काहीतरी खा उपाशी नको जाऊ पण आज काही खाण्याची पण इच्छा नव्हती. पिल्लूला तयार केलं. मम्मा छती अंबेना अंबेना(Umbrella) ड्याडा अंबेना मम्माआआ... नको पिल्लू आज ऊन पण नाही न पाऊस आहे नको चल बाळा लवकर. तिघे पण घरातून निघालो पिल्लूला स्कुल मध्ये सोडलं आणि काय पावसाला रिमझिम सुरवात झाली. धावत पळत त्सुकुबा सेंटर गाठलं कामावर पोहचलो. सुरळीत काम सुरु झालं अर्ध्या तासात मुसळधार पाऊस सुरु झाला त्याचबरोबर भूक पण दाबून लागली. काहीतरी वडापाव भजी खावीशी वाटताय, आज घरी जाऊन मस्त वडापाव करू. थोड्यावेळाने चिकन चिली खावीशी वाटली, नाही मग चायनीज बनवू पुन्हा बार्बिक्यू चिकन खाऊ असे अनेक पदार्थांच्या चवी आठऊ लागल्या. मुंबईचा वडापाव जास्त आठवत होता. मुंबईच्या सगळ्या खाऊ गल्ली भरपूर आठवत होत्या. पण आज घरात उपलब्ध आहे ते वड्याच सामान पाव पटकन आणू. ओके वडापाव Done!.... तेव्हड्यात म्यानेजर आला. आणि म्हणाला Rajashri-San.. Haai(Yes) outside is thunder storm and heavy rain, Ohhh really?, पिल्लुच्या स्कुल मध्ये कॉल करायला हवा मनात विचार करून नवऱ्याला मेसेज केला. तोपर्यंत म्यानेजर चा आवाज आला Rajashri-San, Haai! Do you want to eat Takoyaki(Octopus Ball)? No Thank you! अरेच्च्या हे पण वडापाव सारखच वाटत पण वड्याची चव Octopus ला कुठे... हा.हा..हा...हा.....! घरी आल्याबरोबर मोबाईल चाळला. सगळीकडे वडापावच दर्शन झाल, का तर म्हणे जागतिक वडापाव दिन...! राव कोणी हे दिन बिन बनवलेत माहित नाही पण ज्याने कोणी बनवलेत ते आपल्यासाठी भारीच आहेत. आणि जागतिक वडापाव दिन म्हणजे आपला वडापाव जगात प्रसिद्ध आहे तर?,....! जपान मध्ये वडापाव विकायला सुरु करून द्यावा अस प्रकर्षाने आज मी मनावर घेतल(जो जपान मध्ये कुठेही मिळत नाही).. नाही म्हणजे माझ्या सारख्या बिनगरोदरी डोहाळे लागणाऱ्यांची सोय हो, आपल दुसर काही नाही. आणि जागतिक वडापाव दिवस हा खरोखरच संपूर्ण जगात साजरा होतोय याचा आनंद आपल्या पासूनच सुरवात करूया.... 

          पुढे काय मग संध्याकाळी लागले वडापावच्या तयारीला... सगळी तयारी करून ठेवली पाव आणायला YorkTown (YorkBenimaru) मध्ये तीघेपण पोहचलो. 8pm early night walk करून आलो घरी येऊन गरमागरम वडापाव आणि बटाटा भजी तयार..... ढणटडांग....! पिल्लू, ड्याडा वडापाव लेलो, वडा पाव... फ्री मे वडापाव लेलो.. फ्री मे वडापाव... लेलो लेलो लेलो... फ्री वडापाव, फ्री वडापाव, फ्री.. फ्री... फ्री..... जेवढे फ्री फ्री फ्री शब्द वापरलेस न त्यांची किंमित वडापावच सामान आणायसाठी मी आधीच चुकवली आहे. ड्याडा ला फ्री हा शब्द आवडला नाही बहुतेक पिल्लू हा.हा....हा..... जाऊदे पिल्लू कोणाच्या आवडीनिवडीच काय करायचं आपल्याला चल आपण आपला वडापाव खाऊ ए बाळा. वदापाव... वदापाव.... ह्या चुटक्या वदापाव वाल्याला मात्र फोटो काढेपर्यंत दम नाही. असा आमचा जापनीज वडापाव.... जागतिक वडापाव दिन वर्षातून एकदा नाही असा कित्त्येकदा साजरा होतो त्यात हा अजूनच स्पेशल अचानक भयानक साजरा झाला. 
जागतिक वडापाव दिनाच्या शुभेच्छ्या ह्याच कि कुठेही जा कुठेही रहा उपाशी राहू नका वडापाव दाबून हाणून खा. बनवायलाहि सोप्पा अनं खायलाही चटकदार....
वड्यासोबत चिंचेची चटणी नसते पण मला आवडते म्हणून मी करते, वड्याच्या पिठाची चटणी पीठ नउरल्या मुळे ती राहून गेली.
रेसिपी माझ्या मम्माची तिच्या हातच्या वड्याची चव भन्नाट असते. 

प्रत्येक वड्यावर माझं नाव लिहलंय बरं चोरून खाऊ नका, अहो म्हणजे वडे फॉरवर्ड करताना जरा जपून असं....😉

वडापाव लेलो वडापाव फ्री वडापाव..... फ्री.. फ्री.... फ्री.....(हे शेवटच वाक्य ड्याडा साठी) हसू नका बरंरर......😂😁

Rajashri Jagtap

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...