मुख्य सामग्रीवर वगळा
लग्नातील शालू....!

     माझ्या लग्नातील शालूची गम्मतच निराळी. जेव्हा पासून लग्न सोहळा या बद्दल समजल तेव्हा पासून मनात होत कि माझ्या लग्नात गडद हिरवा  (त्याला मी “Bottle Green अस म्हणायचे) शालू घेईल.
         
         लग्न ठरल्या पासून हिरव्या शालूच्या Images Internet वरून Search करून save करून ठेवणे. कधी वेळ असेल तेव्हा साडीच्या दुकानात एकटीच जाऊन असच बघून येणे. कधी कधी तर दुकानदाराला त्रासही दिला. हा हिरवा नाही हो, या पेक्षा गडद हिरवा हवाय. त्यावर दुकानदार वैतागून Madam! हाच हिरवा जास्त चालतो. त्यातल्या त्यात आता ति Fashion एवढी राहिली नाही. काही दुकानदार तर वैतागून चक्क म्हणाले हिरवा शालू बगीतलाय का कधी? कोण घालत का? शालुचे रंग हे राणीColour, वांगीColour, चिंतामणी, Maroon असे जेमतेम ठरेलेले ५, ६ Colours दाखवत होते, त्यावर मलाही राग आला. जरा चिडूनच म्हंटल अहो काका सर्वात पाहिलांदा शालू हा प्रकार आला तेव्हा हिरवाच रंग प्रचलित होता.
त्यावर मराठी गांण हि आहे..... 

शालू हिरवा, पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा...
गोऱ्या भाळी, चढावा जाळी, नाव्रत्नानाची माला
साजणी बाई येणार साजण माझा...

     एका दुकानदाराने तर म्हंटल लग्नात कोणी सहसा हिरवा शालू घालत नाही, डोहाळे जेवणात घालतात - तेव्हा हिरवी साडी घाला कि, आता दुसरा रंग घ्या शालू मध्ये म्हणजे दोन्ही हौस पूर्ण होतील...
बापरे हसुन-हसून माझा जीव गेला डोक्याला हात लाउनच घरी आले.
    
     लग्नाच्या जेमतेम दीड महिना आधी बस्ता बांधायला सर्व जमले. ओझर च्या एका Textile मध्ये हिरवा शालू Try केला. पहिलाच होता तो...

पण जेव्हा तो नेसला तेव्हा सर्वांच्याच लक्षात आले कि हिरवाच का?... 
हिरव्या पिक्कानी जेव्हा धरती नटते तेव्हा
तो थाट काही निराळाच असतो,
तसच काहीतरी स्त्री सौन्दर्याच देखील झाल.
शालुच महत्वच तसं फार वेगळ आहे.
कोणतीही साडी केव्हाही घेऊ शकतो....
पण, शालू मात्र लग्नातच नवरी साठी घेतला जातो.
त्यावर जरी बुटीच काम हे ठरलेले चार पाच प्रकारचंच,
शालू च माहेर घर हे बनारस, पूर्वी चांदीचे जरी Works असणारे शालू आजही वेगवेगळ्या प्रकारात मिळतात, पण नवर्यामुलीसाठी शालू हा अनमोलच असतो.
    
       पप्पांचे तर डोळे पाणावले, लग्नाची लाख तयारी झाली होतीपण मुलगी नवरी जाहली हे तर  शालू नेसल्यावरच लक्षात आले.....
            जड-भारी आवाजात पप्पा म्हणाले अजून भारीतला दाखवा नवरी Japan ला जाणार आहे. बापाच्या हळव्या आवाजाने सर्वांच्या नजरा वेधल्या पण हे पप्पानच बोलन कारणच होत, जणू काही ति वेळ मारून नेन्याच...
पूर्ण नाशिक दिवसभर फिरलो हवा तसा शालू मिळेना.

 शेवटच दुकान म्हणत आत शिरलो तिथे सर्वांनी
Maroon Colour चा शालू पसंत केला.
मनावर खूपच दडपण आलं, नकोच होता ना!...             
तस नवऱ्यालाहि Photo पाठवले
तर त्यांनीही म्हंटल तिला आवडला असेल तरच घ्या
जबरदस्ती नको,
चेहऱ्यावरील हावभाव पाहून सर्वांनाच वाईट वाटले,
नको म्हणून सर्वांनी म्हंटल आणि घरी निघालो.

          रात्री ९.३० झाले होते. सगळेच वैतागले थोडेफार चीडलेहि होतेच.
हा छान होता तो छान होता आमुक दुकानातला तमुक Colour चा छानच होता. अशा Comments च नाही तर ओरडा सुधा मिळाला. किती नखरे तुझे, अक्ख्या घरादाराला फिरवलस पण शालू नाही घेतलास.
आता कुठून आणणार आहेस तुझा Bottle Green इथे नाशिक मध्ये तर नाही कुठे. आमुक तमुक इथलाच घेऊन टाक.
            त्याच रात्री पप्पानंची ट्रेन होती ते नौकरी निम्मित अकोल्याला होते. थोडेफार माझ्यावर चिडूनच निघाले.
मलाही रात्रभर झोप नाही लागली, सकाळी उठून आरशात बघत हात पाय आपटत स्वतावरच चिडत बडबडत म्हंटल मी नाही घेणार दुसरा कुठलाच Colour ईई ई...
     
     पण अकोल्याला जाऊन पप्पानाही वाईट वाटल आणि दुसर्या दिवशी बरेच दुकान शोधून संध्याकाळी १५, २० हिरव्या शालुचे Photos पाठवले आणि Message सुद्धा “हे घे हिरवे शालू, तुझा Bottle Green... ये अकोल्याला इथे भरपूर Bottle Green शालू आहेत. तुला कुठला आवडला ते सांग, मी दुकानदाराला काढून ठेवायला सांगतो. आणि काय मग बाई खुशच कि बापानं अपेक्षित गोष्ट पूर्ण केली होती. मग काय १५ दिवसात मम्मी आणि मी अकोल्याला गेलो. आणि हवा तसा Bottle Green शालू घेतला. किंमतही तशीच होती म्हणा....
     
      हा आयुष्यातला प्रसंग लिहिण्यामागे मात्र अजून एक कारण अस कि, पूर्ण २७ वर्षामध्ये लेकीला एकही साडी न घेणाऱ्या बापाने मुलीच्या लग्नात मात्र कोणतीच कसर सोडली नाही. चार चार हजाराच्या साड्या, आवडीचा भारीतला भारी शालू, आणि घाग्रा, साड्यान्वर्ती Complimentary Gift च म्हणा आणि त्या घाग्र्यासाठी Special Ceremony ठेवली गेली जी संपूर्ण विवाह नियोजनात नव्हती. आयुष्यभाराची हौस पूर्ण केली होती.    


                                                                                                                                                पप्पा.....! आता हि आपली संपूर्ण भावना लिहिण्या मागचा हेतू असा कि, मी लवकरच India मध्ये येत आहे, फिरुया मग...., पुन्हा भरपूर दुकानं.....! हाहा..हां......!

तुमची राजू.....!




































                                                                     

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...