लग्नातील शालू....!
माझ्या
लग्नातील शालूची गम्मतच निराळी. जेव्हा पासून लग्न सोहळा या बद्दल समजल तेव्हा
पासून मनात होत कि माझ्या लग्नात गडद हिरवा (त्याला मी “Bottle Green” अस म्हणायचे) शालू घेईल.
लग्न ठरल्या पासून हिरव्या शालूच्या Images Internet वरून Search करून save करून ठेवणे. कधी वेळ
असेल तेव्हा साडीच्या दुकानात एकटीच जाऊन असच बघून येणे. कधी कधी तर दुकानदाराला
त्रासही दिला. हा हिरवा नाही हो, या पेक्षा गडद हिरवा हवाय. त्यावर दुकानदार वैतागून
Madam! हाच हिरवा जास्त चालतो. त्यातल्या त्यात आता ति Fashion एवढी राहिली नाही. काही
दुकानदार तर वैतागून चक्क म्हणाले हिरवा शालू बगीतलाय का कधी? कोण घालत का? शालुचे रंग हे राणीColour, वांगीColour, चिंतामणी, Maroon असे जेमतेम ठरेलेले ५,
६ Colours दाखवत होते, त्यावर मलाही राग आला. जरा चिडूनच म्हंटल अहो काका सर्वात पाहिलांदा
शालू हा प्रकार आला तेव्हा हिरवाच रंग प्रचलित होता.
त्यावर मराठी गांण हि
आहे.....
शालू हिरवा, पाचू नि मरवा
वेणी तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा...
गोऱ्या भाळी, चढावा जाळी,
नाव्रत्नानाची माला
साजणी बाई येणार साजण
माझा...
एका दुकानदाराने तर म्हंटल लग्नात कोणी सहसा
हिरवा शालू घालत नाही, डोहाळे जेवणात घालतात - तेव्हा हिरवी साडी घाला कि, आता
दुसरा रंग घ्या शालू मध्ये म्हणजे दोन्ही हौस पूर्ण होतील...
बापरे हसुन-हसून माझा जीव
गेला डोक्याला हात लाउनच घरी आले.
लग्नाच्या जेमतेम दीड महिना आधी
बस्ता बांधायला सर्व जमले. ओझर च्या एका Textile
मध्ये हिरवा शालू Try केला. पहिलाच होता तो...
हिरव्या पिक्कानी जेव्हा धरती नटते तेव्हा
तो थाट काही निराळाच असतो,
तसच काहीतरी स्त्री सौन्दर्याच देखील झाल.
शालुच महत्वच तसं फार वेगळ आहे.
कोणतीही साडी केव्हाही घेऊ शकतो....
पण, शालू मात्र लग्नातच नवरी साठी घेतला जातो.
त्यावर जरी बुटीच काम हे ठरलेले चार पाच प्रकारचंच,
शालू च माहेर घर हे बनारस, पूर्वी
चांदीचे जरी Works असणारे शालू आजही वेगवेगळ्या प्रकारात मिळतात, पण नवर्यामुलीसाठी
शालू हा अनमोलच असतो.
पप्पांचे तर डोळे पाणावले, लग्नाची लाख तयारी झाली होती. पण मुलगी नवरी जाहली हे तर शालू नेसल्यावरच लक्षात आले.....
जड-भारी आवाजात
पप्पा म्हणाले अजून भारीतला दाखवा नवरी Japan ला जाणार आहे. बापाच्या हळव्या आवाजाने सर्वांच्या
नजरा वेधल्या पण हे पप्पानच बोलन कारणच होत, जणू काही ति वेळ मारून नेन्याच...
पूर्ण नाशिक दिवसभर फिरलो
हवा तसा शालू मिळेना.
Maroon Colour चा शालू पसंत केला.
मनावर खूपच दडपण आलं, नकोच
होता ना!...
तस नवऱ्यालाहि Photo पाठवले
तर त्यांनीही म्हंटल तिला
आवडला असेल तरच घ्या
जबरदस्ती नको,
चेहऱ्यावरील हावभाव पाहून
सर्वांनाच वाईट वाटले,
नको म्हणून सर्वांनी म्हंटल
आणि घरी निघालो.
रात्री ९.३० झाले होते. सगळेच वैतागले थोडेफार
चीडलेहि होतेच.
हा छान होता तो छान होता
आमुक दुकानातला तमुक Colour चा छानच होता. अशा Comments च नाही तर ओरडा सुधा
मिळाला. किती नखरे तुझे,
अक्ख्या घरादाराला फिरवलस पण शालू नाही घेतलास.
आता कुठून आणणार आहेस तुझा Bottle Green इथे नाशिक मध्ये तर नाही कुठे. आमुक तमुक इथलाच
घेऊन टाक.
त्याच रात्री पप्पानंची ट्रेन होती ते नौकरी निम्मित अकोल्याला होते. थोडेफार
माझ्यावर चिडूनच निघाले.
मलाही रात्रभर झोप नाही लागली, सकाळी उठून आरशात
बघत हात पाय आपटत स्वतावरच चिडत बडबडत म्हंटल मी नाही घेणार दुसरा कुठलाच Colour ईई ई...
पण
अकोल्याला जाऊन पप्पानाही वाईट वाटल आणि दुसर्या दिवशी बरेच दुकान शोधून
संध्याकाळी १५, २० हिरव्या शालुचे Photos
पाठवले आणि Message सुद्धा “हे घे हिरवे शालू, तुझा Bottle Green... ये अकोल्याला इथे भरपूर Bottle Green शालू आहेत. तुला कुठला
आवडला ते सांग, मी दुकानदाराला काढून ठेवायला सांगतो. आणि काय मग बाई खुशच कि
बापानं अपेक्षित गोष्ट पूर्ण केली होती. मग काय १५ दिवसात मम्मी आणि मी अकोल्याला
गेलो. आणि हवा तसा Bottle Green शालू घेतला. किंमतही तशीच होती म्हणा....
हा आयुष्यातला प्रसंग लिहिण्यामागे मात्र अजून एक कारण अस कि, पूर्ण २७ वर्षामध्ये
लेकीला एकही साडी न घेणाऱ्या बापाने मुलीच्या लग्नात मात्र कोणतीच कसर सोडली नाही.
चार चार हजाराच्या साड्या, आवडीचा भारीतला भारी शालू, आणि घाग्रा, साड्यान्वर्ती Complimentary Gift च म्हणा आणि त्या घाग्र्यासाठी
Special Ceremony ठेवली गेली जी संपूर्ण विवाह नियोजनात नव्हती. आयुष्यभाराची
हौस पूर्ण केली होती.
पप्पा.....! आता हि आपली संपूर्ण भावना लिहिण्या मागचा हेतू असा कि, मी लवकरच India मध्ये येत आहे, फिरुया मग...., पुन्हा भरपूर दुकानं.....! हाहा..हां......!
तुमची राजू.....!
Hahaha, खूप मस्त लिहिलं आहे. असंच लिहीत राहा, आणखी वाचायला आवडेल. :)
उत्तर द्याहटवाधन्यवाद! नक्कीच.....
उत्तर द्याहटवा